डॉ.शेफाली भुजबळ यांच्या चित्रांचा दुबईतील वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे होणाऱ्या प्रदर्शनात सहभाग
- Sandeep patil
- Apr 21
- 1 min read

डॉ.शेफाली भुजबळ (Dr. Shefali Bhujbal) यांनी विविध ठिकाणी आयोजित चित्रकला प्रदर्शनात अनेक वर्षांपासून आपली चित्रकला कृती प्रदर्शित केली आहे त्यांच्या चित्रकलेच्या वैशिष्ट्यपूर्ण भाग म्हणजे त्यांचे चित्र हे ॲप्सट्रॅक्ट या शैलीमध्ये मोडतात. एम.ई.टी. भुजबळ नॉलेज सिटीच्या प्रमुख मार्गदर्शिका म्हणून काम बघताना त्यांनी आपला चित्रकलेचा छंद मोठ्या चिकाटीने जपला आहे. याचबरोबर मॅनेजमेंट या विषयाच्या संशोधनात्मक कामाबरोबर त्यांनी अनेक पुस्तके ही लिहिली आहेत. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी या विषयात त्या डॉक्टरेट असून,मुंबई आर्ट सोसायटी, जहांगीर आर्ट गॅलरी आणि “गॅलरी76,” दुबई या चित्र प्रदर्शनामध्ये त्यांचे चित्र यापूर्वी प्रदर्शित झाले आहेत.
तेजस्विनी अवार्ड , विमेन अचीवर अवॉर्ड, जीवनगौरव पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी डॉ. शेफाली भुजबळ यांना गौरविण्यात करण्यात आलेले आहे.दुबई वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे होणाऱ्या दिनांक १७ ते २० एप्रिल २०२५ या काळातील कोणत्याही वर्ल्ड आर्ट दुबई या प्रदर्शनात त्यांची चित्रे निश्चितपणे आपला ठसा उमटवल्याशिवाय राहणार नाही.
Kommentare